छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): तिरंगा यात्रा आणि
सभेचा उत्साहपूर्ण समारोप झाल्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तिरंगा यात्रा मार्गाची स्वच्छता केली. याद्वारे भाजपने इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना शिस्तीचा संदेश दिला.
तिरंगा यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाल्याने मार्गावर पाण्याच्या बाटल्या आणि इतर कचरा निर्माण झाला होता. यात्रा व सभा संपल्यानंतर दिवसभराच्या धावपळीमुळे कार्यकर्ते थकलेले असतानाही त्यांनी विश्रांती न घेता स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली. किशोर शितोळे यांच्यासोबत मराठवाड्याचे संयोजक राहुल लोणीकर, मराठवाड्याचे सहसंयोजक नितीन काळे, शहर सरचिटणीस हर्षवर्धन कराड, नगरसेवक नंदू गवळी, किशोर मानकापे, शंकर म्हात्रे, धनंजय कुलकर्णी, यज्ञेश बसय्ये, प्रथमेश चौधरी, सचिन गुगळे, मंडळाध्यक्ष तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या स्वच्छता अभियानात सहभागी झाले. सर्वांनी मिळून तिरंगा यात्रा मार्गावरील कचरा व पाण्याच्या बाटल्या जमा केल्या. जमा झालेला कचरा एका ठिकाणी एकत्र करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे नियोजनही करण्यात आले. एवढ्या मोठ्या कार्यक्रमानंतरही स्वच्छतेची जबाबदारी गांभीर्याने पार पाडत कार्यकत्यांनी नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














